Monday, 5 October 2015

प्रेमात पडलं की असंच असतं

प्रेमात पडलं की असच असत

तिचा नकार असला तरी
तिला विसरायच नसत..
तिला आनंदी बघुन
आपणही आनंदीच राहायच असत..
कितीही दूर असेल पण
शेवटी प्रेम ते प्रेमच असत...
प्रेमात पडलं की असच असतं...

आलीच ती समोर तर
छान हसायच असतं..
मन दाटून आलं तर
थोड़ रडायच असतं
कितीही दुःख असलं तरी
नेहमी तिला हसवायच असतं..
प्रेमात पडलं की असच असतं....
                            - तुषार हिरे

मनातलं प्रेम