Marathi Kavita and My Sketch Art
I share my poems and sketch works on this blog.... if u like my work then please share it with ur frndsss...
Tuesday 29 December 2015
Monday 5 October 2015
प्रेमात पडलं की असंच असतं
प्रेमात पडलं की असच असत
तिचा नकार असला तरी
तिला विसरायच नसत..
तिला आनंदी बघुन
आपणही आनंदीच राहायच असत..
कितीही दूर असेल पण
शेवटी प्रेम ते प्रेमच असत...
प्रेमात पडलं की असच असतं...
आलीच ती समोर तर
छान हसायच असतं..
मन दाटून आलं तर
थोड़ रडायच असतं
कितीही दुःख असलं तरी
नेहमी तिला हसवायच असतं..
प्रेमात पडलं की असच असतं....
- तुषार हिरे
Monday 28 September 2015
आजच नाही रोजचच आहे....
हे आजच नाही ग
रोजचच आहे...
रोजच ठरवतो तुझ्याशी मी बोलणार नाही,
होऊ दे काहीपण.. आठवण तुझी काढणार नाही..,
पण काय होत कुणास ठाऊक
आठवण आल्याशिवाय राहत नाही...!!
आजच नाही ग हे रोजचच आहे....
Attitude तर खुपच ग मला
ठरवतो Love u पण बोलणार नाही,
पण तू जेव्हा समोर असतेस
शब्द मुकेच राहत नाही....
आजच नाही ग हे रोजचच आहे...
राग जर आलाच मला तुझा
ठरवतो तुला विसरनार मी,
पण नुसत Hii जरी बोललीस तरी
रागच माझा राहत नाही...
अग खरच सांगतो,
आजच नाही ग हे रोजचच आहे....
कवी - तुषार हिरे
Wednesday 1 July 2015
Thursday 23 April 2015
खरच ना यार...
खरच ना यार... हे प्रेम तरी काय असत???
खरच यार... हे प्रेम तरी काय असतं?
आपल प्रेम असून पण
ती कधी भेटत नाही...,
डोळ्यातले अश्रु ही
थोड़े फार आटत नाही...
जरा आपली चूक झाली,
तरी भांडण सुरु होत असतं...
खरच ना यार... हे प्रेम तरी काय असत...?!!
सतत तिला शोधत असतो,
डोळे कधी थकत नाही...,
थांबायचा विचार करतो पण,
मन कुठेच लागत नाही...
तिला बघुनच माझ,
जगण सुंदर होत असतं..,
खरच ना यार... हे प्रेम तरी काय असतं...?!!