Wednesday, 15 April 2015

का विसरलिस....???

का विसरलीस मला अशी,
अजुनही समजत नाही...!!

जाताना तू निदान
चूक तरी सांगायला हवी होतीस,
तुझ्या आयुष्यात पुन्हा आलो नसतो
फ़क्त एकदा मनापासून बोलली असतीस...!!

तुझ्यासाठी सखे मी
सर्व काही केल असत,
फ़क्त एकदा तरी तू
मनापासून मागितल असत....!!

तुझ्याविना मी
खुप एकटा झालोय गं,
पुन्हा येशिल तू परत
याचीच वाट बघतोय गं....

का विसरलीस मला अशी
अजुन ही समजत नाही...!!

                               - तुषार हिरे

No comments:

Post a Comment